breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सर्व वाहतूक सेवांसाठी सिंगल तिकीट योजना, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबईत प्रवास करताना विविध वाहतूक सेवांसाठी वेगवेगळं तिकीट काढण्याची गरज येत्या काळात उरणार नाही, कारण पुढील वर्षीपर्यंत सर्व वाहतूक सेवांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणत सिंगल तिकीट योजनेची सुखद भेट मुंबईकरांना देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

‘उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांच्यासह अन्य परिवहन सेवांसाठी लवकरच एकात्मिक तिकिट प्रणाली आणण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काल (दि. 3) मुंबईत परळ टर्मिनससह विविध रेल्वे सुविधांचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाले , त्यावेळी बोलताना फडणवीसांनी ही माहिती दिली.

याशिवाय, उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबागपर्यंत करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली आहे. पेण ते अलिबाग कॉरीडोरचे काम गतीमान करण्यात येत असून कल्याण ते मुरबाड या मार्गालाही रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांसाठी आणखी १८० सरकते जिनेही मंजुर करण्यात आले आहेत. याशिवाय बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान नवीन चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी दिल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकासासाठी जागा –
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेने ४५ एकर जागा दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. यासाठी रेल्वे व राज्य सरकारमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला. सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘आमचेच सरकार येणार’
रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढेही आमचेच सरकार येईल, असा दावा केला. जे गेल्या ६० वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांत केले. रेल्वेचे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले, असे मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वेमंत्रालयाकडे आणखी काही प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मंजुरीसाठी पाठवणार आहोत.

नवे प्रकल्प
सोलापूर -तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग. आठ नवीन स्थानके , ९०४ कोटींचा खर्च. २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button