breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीगोंद्यात एका नामांकित हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा

श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून १० जुगाऱ्यासह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा शहरातील बसस्थानकपरिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये रूम नंबर १०८ मध्ये काही इसम तिरट नावाचा हारजितीचा खेळ खेळत असल्याची माहिती मिळालेली होती.

गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळताच पोलिसांनी एक पथक तयार करून दि. ०९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ च्या सुमारास अचानक छापा मारला असता बसस्थानकपरिसरातील एका हॉटेलमध्ये रूम नंबर १०८ मध्ये गोल रिंगण करून आपल्या हातात पत्त्या खेळत असल्याचे पोलिसांना दिसले असता, त्यातील एक इसम पोलिसांना पाहून दरवाजा ढकलून जिन्यातून उडी टाकून पळून गेला व इतर जुगाऱ्याना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून सुमारे ३७,१९० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button