breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरचा वीज पुरवठा केला खंडीत

पुणे |महाईन्यूज|

वीज बील थकल्याने वीज वितरणने शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. वीज मंडळाच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी महावितरणच्या विविध कार्यालयाचा व कर्मचारी वसाहतींचा पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका, राज्य शासन व पीएमआरडीएच्यावतीने शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटर उभे केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जम्बोमध्ये अनेक गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले. जम्बोचा चांगला उपयोग कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी झाला. मात्र, शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर जम्बोमधील प्रवेश प्रशासनाने थांबविले होते. मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यातच वीज मंडळाने वीज बील थकल्याने शुक्रवारी जम्बोचा वीज पुरवठा खंडीत केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button