ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शिवसैनिकांनो, पेटती मशाल पुन्हा हाती घ्या; आणि पक्षाची विस्कटलेली घडी एकत्र करण्यासाठी सज्ज व्हा!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर यांचे आवाहन

शिवसेना ठाकरे गटाच्या चिंचवड मतदारसंघात प्रभाग, शाखानिहाय बैठका

पिंपरी ! प्रतिनिधी –

काही जणांनी फितूरी करत शिवसेना फोडली आहे. शिवसैनिकांनो पेटती मशाल पुन्हा हाती घ्या आणि पक्षाची विस्कटलेली घडी एकत्र करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर यांनी शिवसैनिकांना केले आहे.

आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग, शाखानिहाय बैठका सुरू केल्या आहेत. त्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळत असून या बैठकीत मार्गदर्शन करताना घोडेकर बोलत होते. मंगळवारी (दि. 8) रोजी चिंचवड विधानसभेतील प्रभाग क्रमांक 16, 17, 18, 22, 25, 27 परिसरातील वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, किवळे, मामुर्डी, रावेत, चिंचवड गावठाण, पुनावळे, रहाटणी, काळेवाडी, ज्योतिबानगर, तापकीरनगर, विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर नढेनगर, विजयनगर, कोकणेनगर, ज्योतिबानगर, येथे चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग आणि शाखानिहाय भेटीगाठी तसेच बैठका पार पडल्या.

उपजिल्हाप्रमुख हाजी दस्तगीर मनीयार, शहर संघटीका अनिता तुतारे, शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके, शहर समन्वयक कैलास नेवासकर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. शहर संघटक संतोष सौंदणकर म्हणाले की, शिवसेना स्थापनेपासूनच जातीपातींपासून दूर राहिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कुठल्याही जातीबद्दल आप-परभाव बाळगला नव्हता. म्हणून उपेक्षित जातींमधून शिवसेनेने लोकांना स्थानिक स्वराज्य संस्था ते विधीमंडळापर्यंत प्रतिनिधित्व दिले. तोच न्याय यापुढेही कायम राहील. शिवसेना हा पक्ष निष्ठावंत शिवसैनिकांच्या सदैव पाठीशी राहतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button