breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवरायांच्या चरित्रातून आदर्श समाजनिर्मिती आणि बलशाली राष्ट्र घडविण्यास दिशा – महापौर माई ढोरे

पिंपरी / महाईन्यूज

छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातून आदर्श समाजनिर्मिती आणि बलशाली राष्ट्र घडविण्यास दिशा मिळत असून छत्रपती शिवराय हे प्रत्येकाचे प्रेरणास्थान राहील, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी या दोन दिवस चालणा-या ऑनलाईन पध्दतीच्या विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे महापौर माई ढोरे यांचे हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते जीवन बो-हाडे, सागर तापकीर, नकुल भोईर, निलेश शिंदे, प्रतिक इंगळे, धनाजी केळकर, सतिश काळे परशुराम रोडे आदी उपस्थित होते.

अबाल वृध्दांना छत्रपती शिवाजी महाराजांमुळे उर्जा प्राप्त होत असते असे नमूद करून महापौर ढोरे म्हणाल्या महानगरपालिकेच्या वतीने या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर आधारीत विचार प्रबोधन पर्व साजरे होत आहे.  नागरिकांनी यामध्ये ऑनलाईन सहभाग घेऊन घरबसल्या सर्व कार्यक्रम पहावेत. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील राहील.

उपमहापौर केशव घोळवे म्हणाले शिवरायांनी जागतिक किर्तीचे कर्तुत्व गाजवले.  जगाला मार्गदर्शक ठरणा-या या व्यक्तीमत्वाचा अभ्यास नवोदित पिढीने करून देशाला जागतिक पातळीवर अग्रेसर बनवावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button