breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
शरद पवारांची पक्षाच्या 16 मंत्र्यांसोबत तातडीची बैठक…बैठकीत नेमकं काय घडणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-120.png)
मुंबई | महाईन्यूज |
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून सहभागी झालेल्या 16 मंत्र्यांची आज बैठक होणार आहे. मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता पवार मंत्र्यांशी चर्चा करतील. या बैठकीत नेमकं काय घडणार, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-33.png)
शरद पवार 16 मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेणार असल्याचं बोललं जात आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एनआयएकडे तपास सुपूर्द करणं, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचं सांगतानाच पवारांच्या बोलण्यात नाराजी जाणवल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.