breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच ऑडिओ-व्हिडिओची सुविधा; वर्क फ्रॉम होमसाठी ठरणार फायदेशीर

नवी दिल्ली – वर्क फ्रॉम होमसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब फायदेशीर ठरत असले तरी यावरून केवळ मेसेज पाठवणे एवढेच काम करता येते. त्यावरून फोन करता येत नाही. परंतु लोकांची ही अडचण लक्षात घेऊन व्हाट्सअ‍ॅपच्या वेबवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा देण्याची तयारी व्हाट्सअ‍ॅपने सुरू केली आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर लोक घरातून काम करत आहेत. त्यासाठी ते लॅपटॉप आणि संगणकावर व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करत आहेत. त्यावरून त्यांना मेसेज पाठवता येतात. परंतु एखाद्याला फोन करायचा असेल तर त्यांना आपल्या मोबाईलचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांची ही अडचण लक्षात घेऊन ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा या युजर्सना देण्याचा निर्णय व्हॉट्सअ‍ॅपने घेतला आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना आता या फिचरमुळे मोबाईलऐवजी थेट लॅपटॉप आणि संगणकावरून व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून संबंधिताला फोन करणे शक्य होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button