breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वॉकी-टॉकीच्या सहाय्यानं दारू विक्री; पती, पत्नीसह दीराविरोधात गुन्हा दाखल

पुणे |महाईन्यूज|

पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदा दारुविक्रीचा पर्दाफाश केला आहे. वॉकी-टॉकीच्या सहाय्यानं दारू विक्री करणाऱ्या पती, पत्नीसह दीराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

नीलेश बबन काळे, संतोष काळे आणि नीता काळे अशी आरोपींची नावं आहे. तिन्ही आरोपींकडून 1 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील मौजे भावडी येथील हॉटेल मनोरंजनमध्ये नीलेश काळे व संतोष काळे हे दोन सख्खे भाऊ वॉकी-टॉकीचा वापर करून बेकायदा दारू विक्री करत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक व मंचर पोलिसांनी हॉटेल मनोरंजन येथे छापा टाकला. त्यावेळी नीलेश काळे हा मागील दरवाजातून पळून गेला. हॉटेलची झडती घेतली असता, काउंटरजवळ देशी-विदेशी दारू आढळून आली.

पोलिसांनी रुमचे कुलप तोडून तपासणी केली असता रूममधील संडास व बाथरूममध्ये देशी-विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी सुमारे 1 लाख 69 हजार 910 रुपयांची देशी-विदेशी दारू व चार हजार रुपयांच्या दोन वॉकी टॉकी असा एकूण 1 लाख 73 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button