breaking-newsपिंपरी / चिंचवड

वेबसाईटवर भेटलेल्या तरुणाने तरुणीवर केला बलात्कार

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर भेट झालेल्या एक तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मे २०१८ ते मे २०१९ दरम्यान डांगे चौक थेरगाव आणि हडपसर फुरसुंगी येथे घडली.

याप्रकरणी पीडित २७ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल प्रकाश दास (वय ३०, रा. डांगे चौक, थेरगाव मु.रा. परांडा, उस्मानाबाद) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०१८ ते मे २०१९ या कालावधीत आरोपी राहुल आणि पीडित २७ वर्षीय तरुणीची ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर ओळख झाली. त्यानंतर राहुलने तरुणीसोबत जवळीक वाढवून बलात्कार केला. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. आणि ते घरच्यांना दाखवण्याची व सोशल मिडियावर अपलोड करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. आरोपी राहुल सध्या फरार असून वाकड पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button