breaking-newsताज्या घडामोडी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना नागपूर कोर्टाकडून जामीन मंजूर

नागपूर | महाईन्यूज

माजी मुंख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. नागपूर कोर्टाने फडणवीस यांना जामीन मंजूर केलेला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर फडणवीसांना जामीन मंजूर झालेला आहे. २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. याप्रकरणी नागपूर कोर्टाने फडणवीस यांना समन्स बजावलेला होता. त्यानुसार फडणवीस आज कोर्टात हजर राहिले आहेत. याप्रकरणाच्या सुनावणीची पुढची तारीख कोर्टाने दिलेली आहे.

कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर माध्यामांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, ‘हे प्रकरण साधारण १९९५ ते १९९८ दरम्यानचे आहे. झोपडपट्टी काढण्यासंदर्भात कारवाई सुरु असताना आम्ही एक आंदोलन केले होते. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी दोन गुन्हे माझ्यावर दाखल झाले होते.’ तसंच, ‘निवडणूक शपथपत्रात कोणत्याही हेतूने माहिती लपवण्याचा प्रयत्न केला गेला नाही. कनिष्ट कोर्टाने समन्स बजावल्याने आज मी हजर राहिलो.’, असे फडणवीसांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button