breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

विरारमधील दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी, पुण्यातील वरिष्ठ पोलिसाची तब्बल दोन वर्षे पगारकपात

पुणे : येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पगारातून 2 वर्षांसाठी दहमहा 10 हजार रुपयांची कपात करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्यावर विरारमधील दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी शेख यांच्यावर विरार प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत ही शिक्षा सुनावलेली आहे.

युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांनी विकास झा याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी वसई यांच्याकडे सादर केलेला होता. हा प्रस्ताव सादर करताना विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या, केवळ नावात साम्य असलेल्या 3 अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला आहे. वसई येथील मुनाफ बलोच याच्या हस्तक्षेपाने प्रभावित होऊन प्रस्तावाबरोबर जोडायची कागदपत्रेही पूर्वग्रहदूषित हेतूने प्रेरित होऊन वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 10 नोव्हेंबर 2017 रोजी स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केलेली आहे.

भावाला न्याय मिळावा, यासाठी 2 महिने प्रयत्न केला यानंतर विकासचा भाऊ अमित झा याने देखील 20 जानेवारी 2018 रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलं. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहे. तसेच अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यास न पाठविता कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठविले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button