breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
विनय दुबेचा राष्ट्रवादीशी संबंध नाही – नवाब मलिक
मुंबई | वांद्रे येथे मजुरांच्या उद्रेकाला जबाबदार असलेला विनय दुबे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. वांद्रे येथे गावाकडे जाण्यासाठी हजारो मजूर जमले होते. या घटनेला विनय दुबे जबाबदार असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
त्यानंतर तो राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हा खुलासा केला आहे. विनय दुबे हा राष्ट्रवादीशी संबंधित असल्याच्या बातम्या येत आहेत. राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा पद्धतीने बातम्या पेरण्यात आल्या असून हा प्रकार दुर्देवी आहे. दुबेचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.