breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’ रुग्णालयातील अतिरिक्त पार्किंकसाठी 7.81 कोटींचा वाढीव खर्च

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका यशवंतराव चव्हाण रुग्णालय याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. यासह अन्य कामांचे नूतनीकरण करण्याबरोबच अतिरिक्त वाहनतळ तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले. अतिरिक्त वाहतळाच्या सुविधेसाठी तब्बल 7 कोटी 81 लाख 90 हजार 758 रुपये रक्कम खर्ची पडणार आहे. या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत काल बुधवारी (दि. 11) तहकूब करण्यात आला.

‘वायसीएम’ रुग्णालय याठिकाणी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सरू करण्यासाठी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासह नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण करणे, डॉक्टर निवासस्थानाचे नूतनीकरण करणे तसेच, अतिरिक्त वाहनतळाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी तब्बल 30 कोटी 66 लाख 71 हजार 616 रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. हे काम मे. एस. एस. साठे या ठेकेदाराला देण्यात आले आहे. या जागेत सध्या 5 ते 5.50 मी. खोदाई करण्यात आली आहे.

या कामात अतिरिक्त वाहनतळाचा वाढीव खर्च समाविष्ट केल्यास आणखीन 7.81 कोटींचा खर्च आपेक्षीत आहे. या वाढीव खर्चाला मान्यता घेण्यासाठी हा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. मात्र, विरोधकांनी याची सविस्तर माहिती समोर येत नाही, तोपर्यंत हा विषय मंजूर करून नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सभापती विलास मडिगेरी यांनी हा प्रस्ताव तहकूब ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button