breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट
पिंपरी – वाकड येथील शेख वस्ती शेजारी असलेल्या मजुरांच्या लेबर कॅम्पला सकाळी दहाच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. यात सुमारे ३ पत्र्याच्या खोल्या जळून खाक झाल्या आहे. अग्निशमक दलाचे जवान व वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सुदैवाने या आगीत किरकोळ इजा वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही.