breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

वडिलांच्या पीएफच्या पैशाचा वाद, मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बीड | बी़ड येथील मुलांनी आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बीडमधील केज इथल्या कानडी माळी या गावात घडली. पीएफच्या पैशांसाठी मुलाने आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे.

इंदुबाई कुचेकर यांचे पती पोलीस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले. शोध न लागल्याने त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात इंदुबाई कुचेकर यांना पीएफचे नऊ लाख रुपये मिळाले. मात्र ही रक्कम आपल्याला मिळावी. यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी तगादा लावला होता.

या मिळालेल्या पैशांमधील काही रक्कम मुलांना देऊन देखील, उर्वरित रक्कम मिळावी. यासाठी मुलांनी आपल्या जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर इंदुबाई यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button