breaking-newsमहाराष्ट्र

लॉकडाऊनचा राज्याला मोठा फटका, जीएसटीत हजारो कोटींची घट

मुंबई – कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद होते. त्यामुळे महसुली उत्पन्नात घट होऊन तिजोरीत खडखडाट झाला आहे. असे असतानाच आता राज्याला जीएसटीतून मिळणाऱ्या उत्पन्नातही यंदा २३ हजार कोटींची घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जीएसटीमधून राज्य सरकारला ५५ हजार ४४७ कोटी एवढे उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा त्यात ४१ टक्के म्हणजे सुमारे २३ हजार कोटींची तूट झाली आहे. यंदा १ एप्रिल ते २७ ऑगस्टपर्यंत सरकारला जीएसटीतून ३२ हजार ७०२ कोटी मिळाले आहेत. त्यात पेट्रोल व डिझेलवरील व्हॅटचे १० हजार ५४३ कोटी, व्यवसाय कर ७६८ कोटी, एसजीएसटी १५ हजार ९२५ कोटी, आयजीएसटी ५ हजार ४६५ कोटी यांचा समावेश आहे. केंद्राकडे राज्याची यावर्षीची २२ हजार ५०० कोटीची जीएसटीची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. उत्पन्न घटल्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button