breaking-newsआंतरराष्टीय

लवकरच ‘वनप्लस’चा स्मार्ट टीव्ही बाजारात येणार

स्मार्टफोन बाजारपेठेतील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असणाऱ्या वनप्लसने आता टीव्ही बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय गेतला आहे. वेबासाईटवर कंपनीचे संस्थापक पीट लॉऊ यांनी कंपनीच्या वेबसाईटवर लिहीलेल्या एक ब्लॉगमधून यासंदर्भातील घोषणा केली. आजपर्यंत केवळ स्मार्टफोन क्षेत्रामध्ये असणारी आमची कंपनी लवकरच स्वत:चा पहिला स्मार्ट टीव्ही बाजारात घेऊन येणार आहे. या स्मार्ट टीव्ही विभागाचे सर्व काम पीट लॉऊच पाहणार असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आम्ही आमचा स्मार्टफोनचा व्यवसाय वाढवत असून आता टीव्ही क्षेत्रात उडी घेणार आहोत. ‘अ कनेक्टेड ह्युमन एक्सपिरियन्स’साठी आम्ही या उद्योगामध्ये येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वन प्लस टीव्हीच्या माध्यमातून स्मार्टफोनचा वापर जसा सहजरित्या करण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करत यश मिळले तशीच क्रांती आम्ही टीव्ही क्षेत्रात करणार आहोत असे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. हा स्मार्ट टीव्ही केवळ सिनेमे दाखवणार नाही तर तो त्याहून अधिक जास्त कामे करणार आहे. कारण टीव्ही हा बैद्धिक संवाद साधण्याचे उत्तम माध्यम असल्याचे मत पीट यांनी मांडले आहे.

चार प्रकारच्या वातावरणामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत कनेक्टेड रहावेसे वाटते असे पीट या ब्लॉगमध्ये म्हणतात. पहिली जागा म्हणजे घर, दुसरी ऑफिस तिसरी संवाद साधण्यासाठी आणि चौथी प्रवासात असताना. यावरून हा स्मार्ट टीव्ही म्हणजे फोन आणि टीव्हीची कनेक्टीव्हीटी घराबाहेर घेऊन जाणारा पहिलाच टिव्ही असण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे फाइव्ह जी आणि आर्टीफिशियल इंटेलिजन्स या दोन श्रेत्रांमध्ये होणारे बदल आमच्या कंपनीचा पुढील पाच वर्षाच्या वाटचालीसाठी दिशादर्शक ठरतील असेही पीट या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.

कंपनीच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या या ब्लॉगमध्ये टीव्हीचे फिचर्स, तो बाजारात कधी येणार यासंदर्भातील तारीख, त्याचे डिझाइन कसे असणार यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र ‘बिझनेस इन्सायडर’शी बोलताना पीट यांनी हा टीव्ही पुढील वर्षी म्हणजे २०१९ पर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले आहे. कंपनीची पुढील पाच वर्षांची वाटचाल ठरवण्याच्या दृष्टीने हा टीव्ही कंपनीसाठी महत्वपूर्ण पाऊल ठरले असा विश्वास पीट यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button