breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘लंडन आय’च्या धर्तीवर साकारणार ‘मुंबई आय’- अजित पवार

मुंबई | महाईन्यूज

पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध London eye (लंडन आय) या इमारतीच्या धर्तीवर (Mumbai eye) ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलेली आहे.अजित पवार म्हणाले, “जगप्रसिद्ध ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईच्या पर्यटनात मोलाची भर टाकेल अशी ‘मुंबई आय’ इमारत उभारण्याचा सरकारचा विचार चालु आहे. याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्याला सर्वांनी सहमतीही दर्शवली आहे.”

“सी लिंकवरुन वरळीहून बांद्र्याला जात असताना समुद्राच्या किनारी एका जागेवर हे ‘मुंबई आय’ उभारण्याचा विचार चालु आहे. या जागेला जर सीआरझेडची अडचण आली नाही तर इथे चांगल्या प्रकारे ही वास्तू तयार होऊ शकते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांची पूर्तता करण्यात येईल आणि एमएमआरडीएकडून हा प्रकल्प उभारण्यात येईल” अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

काय आहे ‘लंडन आय’?

पहा…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button