breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या प्रदेश सरचिटणीस पदी शिल्पा बिडकर यांची नियुक्ती

पिंपरी ( महा ई न्यूज )- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या पदवीधर संघाच्या सरचिटणीस पदी कासारवाडीतील शिल्पा शैलेंद्र बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदवीधर संघाचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी दिले. 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर संघाच्या सरचिटणीस पदी कासारवाडी येथील शिल्पा शैलेंद्र बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर संघाचे अध्यक्ष सुनिल पाटील आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने पक्षाचे प्रदेश मुख्य सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तसे पत्र दिले आहे.  बिडकर या सध्या पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button