breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावण टोळीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला

पिंपरी –   ‘रावण’ टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड अनिकेत जाधव याच्या स्मृतिदिनानिमित्त या टोळीचा परिसरात दहशत करण्याचा ‘प्लॅन’ होता. रावणसेना निगडी परिसरात दहशत निर्माण करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या टोळीचा डाव पोलिसांना हाणून पाडला असून रावणसेनेच्या टोळीने तेथून पळ काढला आहे. 

रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा २० नोव्हेंबरला वर्चस्ववादातून खून झाला होता. त्याच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली परिसरात पुन्हा गॅंगची दहशत निर्माण करण्याचा रावण टोळीचा डाव होता. पोलिसांनी देखील गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. चौकाचौकात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आले होते. ज्या ठिकाणी अनिकेचा खून झाला त्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरु होती. रावणसेना हद्दीत घुसल्यानंतर बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करून रावणसेनेवर झडप घालण्यात येणार होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या जय्यत तयारीची कुणकुण रावणसेनेला लागल्याने टोळीने या हद्दीतून पळ काढला. 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button