breaking-newsराष्ट्रिय

‘राफेलप्रकरणी मोदींनी गंगा नदीत डुबकी घेऊन पापक्षालन करावे’

राफेल करारावरुन मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणातील आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने मोदी सरकारला शपथेवर खोटी साक्ष देणे आणि न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी नोटीस देण्याचीही मागणी केली आहे. पंतप्रधान कुंभच्या धार्मिक यात्रेला जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी गंगा नदीत जाऊन डुबकी घ्यावी, असे ते म्हणाले.

View image on Twitter

ANI

@ANI

Anand Sharma, Congress: Govt misled the Supreme Court to get a manipulated judgement & when this glaring error came to notice, they told the SC couldn’t understand English language. Therefore we demand that the SC immediately recall this judgement, which is void. #RafaleVerdict

पंतप्रधान मोदींनी रविवारी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेली येथे राफेलवर सुरु असलेल्या वादावरुन काँग्रेसवर टीका केली होती. त्यांनी राहुल गांधी हे खोटं बोलत असल्याचा आरोप करत जे लोक देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामागे काँग्रेस उभी राहत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन मोदींना चोख शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की, राफेल विमानांच्या किंमतीवरुन कॅगचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सादर केल्याचे सांगून सरकारने विशेषाधिकाराचा अवमान केला आहे. ते कुंभच्या धार्मिक यात्रेवर जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी पापक्षालन करायला हवं, त्यांनी पवित्र गंगा नदीत जाऊन स्नान केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राफेलबाबत जो निर्णय आला आहे, त्यामध्ये विरोधाभास आहे. सर्वोच्च न्यायालय योग्य व्यासपीठ नाही. याचा केवळ जेपीसीमार्फतच तपास झाला पाहिजे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली आहे. त्या आधारावरच न्यायालयाने निकाल दिला आहे. सरकारने किंमतीची विस्तृत माहिती कॅगला दिली. त्यानंतर कॅगने तपास करुन ती पीएसीला दिली. ही चुकीची माहिती सरकारने न्यायालयाला दिली आहे. कॅगचा अहवालही आला नाही आणि तो पीएसीलाही देण्यात आला नाही. सरकारने आता दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे. यावरुन सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे त्यांनी म्हटले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button