breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, ‘या’ मंत्र्यांचा होऊ शकतो पत्ता कट

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याची यादीही भाजपने तयार करुन दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जातेय. निवडणुकीला पूरक ठरतील असे बदल मंत्रिमंडळात केले जातील. भाजपच्या दोन ते तीन कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळणार असल्याची माहिती मिळतेय.

कामगिरी हा निकष भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षम आणि पक्ष संघटना वाढीला पूरक ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. दरम्यान,दस-यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. नव्या मंत्रिमंडळात अनेक काही चेहरे समाविष्ट होणार असले तरी कार्यक्षमता या निकषावर काहीजणांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. यात लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर, मुंबईच्या विद्या ठाकूर आणि विनोद तावडे यांचा समावेश असेल असे सूत्रांनी सांगितले. विस्तारासाठी नव्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठविण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

खडसे यांना परत मंत्री केले जाईल का या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांच्या समावेशाला भाजपा श्रेष्ठींनी अद्याप होकार दिलेला नाही,असे सूत्रांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खडसेंना पुन्हा मंत्री करण्याचा आग्रह आहे. मात्र, खडसेंबाबत हायकमांड नाराज असल्याचे चित्र आहे.

या मंत्र्यांना दिला जाऊ शकतो डच्चू

फेरबदलात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे देखील डेंजर झोनमध्ये असल्याचं बोलले जात आहे.

या नेते मंडळींची लागू शकते मंत्रीपदी वर्णी

विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.विद्या ठाकूर यांना वगळून योगेश सागर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button