breaking-newsपिंपरी / चिंचवड

राज्यातील नाभिकांसह बारा बलुतेदारांचा प्रश्न शासनाने तात्काळ मार्गी लावावा : रामदास सूर्यवंशीे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सध्या निसर्ग चक्रीवादळ व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नाभिक,परीट,कुंभार आदी बलुतेदारांची दुकाने बंद असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना गेली अडीच महिने करावा लागत आहे त्या त्रासामुळे ते आत्महत्येसारख्या वाईट पर्यायाकडे वळू शकतात त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून त्यांची दुकाने चालू करीत त्यांना तीन महीने १५०००/- रुची आर्थिक मदत करून त्यांच्यात सकारात्मकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन बारा बलुतेदार समाज विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी केले.
बारा बलुतेदार संघातर्फे गेल्या अडीच महिन्यापासून बलुतेदारांच्या विविध मागण्यां पूर्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे पण फक्त आश्वासन पदरी पडत होते याबाबत ठोस भूमिका शासनाच्यावतीने घेत नसल्याने राज्यात बलुतेदार कारागीरांना अन्नधान्य किटचे वाटप करीत विविध मागण्यांचे फलक दर्शवत लक्षवेध आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.
रामदास सूर्यवंशी पुढे म्हणाले की,नाभिक व परिट,शिंपी,चर्मकार आदी बलुतेदार बांधवांची अवस्था बिकट झालेली असून त्याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेतला पाहिजे अन्यथा हे आंदोलन भविष्यात जनहितासाठी व जनरेट्यामुळे मोठ्या प्रमाणात करावे लागेल त्यासाठी बलुतेदार युवकांना पुढाकार घेण्यास शासनाने भाग पाडू नये असा इशाराही यावेळी त्यांनी दिला
राज्यातील यंदाचा लग्नसराईचा हंगाम तसेच शैक्षणिक कपडे शिलाई हंगाम कोरोनामुळे वाया गेला तसेच आता पावसाळ्यामुळे बलुतेदारांचे व्यवसायांना कमी प्रमाणात ग्राहक प्रतिसाद देतील त्याचबरोबर या चक्रीवादळाने व महामारीमुळे ग्राहक घराबाहेर फारसे पडणार नाहीत त्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडलेत तर आगामी काळातही मोठ्या प्रमाणात बंद होण्याची शक्यता आहे.शासनाने हा धोका लक्षात घेऊन व्यवसाय वाचवण्यासाठी सर्वंकष आर्थिक मदतीसह व्यापक धोरण ठरवण्याची गरज आहे पण तसे होताना दिसत नाही उलट नकारात्मकता जास्त अनुभवास येत असल्याने बलुतेदार हवालदिल झालेला आहे. केंद्र व राज्य सरकारने मनपा, नपा, झेड पी,ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून निधी देऊन व व्यवसाय उभारी धोरण राबवत त्यांना उभारी दिली पाहिजे.
बलुतेदार समाज बांधवांनी राज्यात मंत्री, लोकप्रतिनिधी, महापौर व आयुक्त यांच्याशी मागण्याबाबत चर्चा करीत कारागीरांना अन्नधान्य किटचे वाटप करीत लक्ष वेधलेले आहे.यात बलुतेदारांना 10 लाखाचे आरोग्य विम्यासह हेल्थ कार्ड द्यावे आणि त्यांचे लाईटबील माफ करावे,दुकान व घरभाडे माफी द्यावी तसेच याबाबत जर मालक त्रास देत असेल तर नगरसेवकासह पालिका प्रशासनाने त्यांना मदत करावी.तसेच त्यांनी अन्नधान्यासह किराणा किट काही याकाळात द्यावे.,
पीपीई किट शासनातर्फे अल्पदरात मिळावे,बलुतेदार आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, केश शिल्पी व माती कला बोर्ड लवकर सुरू करावे. शिंपी, सुतार, सोनार कला बोर्डाची स्थापना व्हावी, बलुतेदारांना 50,000/-चे शासनाने पतकार्ड द्यावे आदी अनेक मागण्या प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी पदाधिकारी यांच्यासह
सकारात्मक दृष्टीने लक्षवेध आंदोलन अन्नधान्य किटचे वाटप करीत वेगवेगळ्या ठिकाणी केले.
पुणे शहरातर्फे शहराध्यक्ष राजेश भोसले, सचिन उदावंत, सुनील पवार,विशाल वाळुंजकर,प्रशांत घेवरीकर, आदींनी केले पर्वती मतदारसंघात अध्यक्ष सूर्यकांत भोसले, बाळासाहेब ढवळे,जंगल गद्रे, ज्योत्स्ना चिंचवले यांनी केले तर खडकवासला मतदार संघात अध्यक्ष नितीन भुजबळ, निलेश सैंदाणे,विनायक रणदिवे,अमोल थोरात, प्रकाश क्षीरसागर यांनी केले.हडपसर मतदार संघात मा सरपंच अजितकाका गायकवाड,डाॅ,लालासाहेब गायकवाड,प्रसिद्धिप्रमुख प्रशांत गायकवाड, नारायण खजिनकर,नितीन काशिद यांनी केले तर कसबा मतदार संघात अध्यक्ष विनायक गायकवाड,अॅड प्रकाश सिंदेकर,रविंद्र मावडीकर,दीपक शिंदे, मंगेश डाखवे यांनी केले कॅन्टोन्मेंट मतदार संघातून रोहीत, यवतकर, सुनिल शिंदे, कुमार शिंदे,दिपक कु-हाडे,महेश जांभूळकर आदींनी केले. आळंदी विभागातून माऊली रायकर, अध्यक्ष सचिन राऊत, बाप्पा रायकर, मनोहर दिवाणे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर शाखेत अध्यक्ष हेमंत श्रीखंडे, प्रदीप वाळुंजकर,राजेंद्र गायकवाड, गणेश वाळुंजकर आदींनी केले .तळेगाव ढमढेरे येथे गणेश पंडीत, गोरक्षनाथ क-हेकर,आदीनी केले.सांगली, सातारा व कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रात व राज्यात इतरत्र स्थानिक पातळीवर पदाधिकारी यांनी केले
खासदार,मंत्री,विरोधी पक्ष नेते,आमदार,नगरसेवक,पक्ष पदाधिकारी आदी अनेकजण नाभिकांसह बलुतेदारांना मदत करणेबाबत आग्रही असताना मुख्यमंत्री,अर्थमंत्री,आणि मदत पुर्नवसन मंत्री का निर्णय घेत नाहीत हा आमचा शासनाला सवाल आहे.सदर मागण्यांचा इमेल सर्वांनी राज्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कलेक्टर यांनाही बलुतेदारांतर्फे पुन्हा करण्यात आलेला आहे असेही सूर्यवंशी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button