breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17,52,509 वर

  • मुंबईत 541, पुण्यात 368 नवे रुग्ण

मुंबई – मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या 2,840 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17,52,509 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 5,123 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 68 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 16,23,503 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 46,102 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 81,925 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 541 नवे रुग्ण आढळले, तर 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,70,654 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,596 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 1,565 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, यासह मुंबईत आतापर्यंत 2,47,339 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 8,946 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,32,145 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,196 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 420 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,14,867 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 368 रुग्णांपैकी 163 रुग्ण हे पुणे शहरातील आणि 95 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button