breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रक्षाबंधन : लाडक्या ताईच्या प्रेमापोटी “दादा”चे वाहतुकीला शिस्तबंधन

  • आमदार महेशदादा लांडगे उतरले रस्त्यावर
  • काही क्षणातच बहिणींच्या पुढील अडथळा केला दूर

 

पिंपरी – “सोनियाच्या ताटी… उजळल्या ज्योती… ओवाळीते भाऊराया… वेड्या बहिणीची वेडी ही माया…” या गीताप्रमाणे भाऊ-बहिणीचे नाते जपण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या संबंध बहिणींनी आपल्या भाऊरायांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. दरम्यान, भाऊरायाच्या प्रेमापोटी राखी बांधण्यासाठी घरी निघालेल्या बहिणींना रस्त्यात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. मुहूर्त निघून जाऊ लागल्याने बहिणींची होणारी घालमेल पाहून भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी महामार्गावरील वाहतूक कोंडी पुर्ववत करण्यासाठी स्वतः मदतकार्यात सहभाग घेतला. त्यावेळी लाडक्या ताईंच्या प्रेमापोटी दादांनी वाहतुकीला कसे शिस्तीचे बंधन घातले, त्याचा प्रत्यय भोसरीत पहायला मिळाले.

 

आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला गेला. आज रविवारी (दि. 26) दुपारी पुणे-नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक नागरिक या कोंडीत अडकले होते. यावेळी बहिनींना आपल्या भावाला वेळेवर राखी बांधता यावी, यासाठी फेसबुक मित्र राजगुरूनगर यांच्याकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी मदत कार्य सुरू होते. वाहतूक कोंडी एवढी प्रचंड होती. या वाहतूक कोंडीमुळे शहरातील बहिणींची होणारी घालमेल पाहताक्षणी भोसरीचे आमदार महेशदादा यांनी तातडीने पुणे-नाशिक महामार्गाकडे धाव घेतली. कोंडीची परिस्थिती पाहताच गाडीतून उतरून त्यांनी तत्क्षणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य सुरू केले. आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सहकार्य केले. त्यांनी केलेल्या मदतकार्यामुळे अनेकांना रक्षाबंधनाचा सण वेळेवर साजरा करता आला.

 

रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी बहिणींची एकच धावपळ सुरू होती. मात्र, माहेरी अथवा शिक्षणासाठी बाहेर असलेल्या बहिणींनी वेळेअभावी आजच भावाला राखी बांधण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे सकाळी वेळेत घरी पोहोचण्यासाठी बहिणींनी गाडी पकडली. तर, काहीजणी दुचाकी, चारचाकी मोटारीतून निघाल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांना भोसरीतील या मार्गावर अडकून पडावे लागले. त्यामुळे महेश दादांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून या बहिणींशी असलेले भावाचे नाते जपत समोरील कोंडीचा अडथळा दूर केला. रक्षाबंधन सणानिमित्त दादांनी वाहतुकीला शिस्तीचे बंधन घातले. त्यामुळे ताईच्या मदतीसाठी दादाच धावून गेला, अशी भावना भोसरी परिसरातील बहिणींनी सोशल मिडियावर व्यक्त केली. तर, या कार्यामुळे दादांचे कार्यकर्त्यांमध्ये कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button