breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘येस’ बँकेत अडकलेले महापालिकेचे ९८४ कोटी दोन दिवसात मिळणार

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपी गोळा झालेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये खासगी क्षेत्रातील येस बँकेत अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेचे पैसे सुरक्षित राहावेत, तसेच लवकर परत मिळावेत, याकरिता आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आरबीआयकडे पत्र व्यवहार केला होता. मात्र, बँकेवरील निर्बंध उठविण्यात येणार असल्याने दोन दिवसात पिंपरी महापालिकेचे पैसे मिळणार आहेत.

येस बँकेची आर्थिक स्थितीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकवर गुरुवारी (दि.५ मार्च) निर्बंध लागू केले. प्रशासकाची नियुक्ती केल्याने ग्राहकांमध्ये घबराट पसरली. या निर्बंधांमुळे पिंपरी महापालिकेचे कररुपातून गोळा झालेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये बँकेत अडकले होते. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आरबीआयकडे पत्र व्यवहार केला होता.

तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेवून पिंपरी चिंचवड महापालिकेचे येस बॅंकेत अडकलेले पैसे लवकर देण्याची मागणी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल ९८४.२६ कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. जनतेच्या करातून जमा झालेला हा पैसा आहे. त्यामुळे महापालिकेचे पैसे तातडीने अदा करण्याचे निर्देश आरबीआयला देण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली.

दरम्यान, बँकेवरील निर्बंध उठविण्यात येणार आहेत. दोन दिवसात पिंपरी महापालिकेचे पैसे मिळतील. तुम्ही निश्चित रहा, असे आश्वासन अर्थराज्यमंत्री ठाकूर यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button