breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त CSMT आणि BMC च्या इमारतींंवर तिरंंग्याचे सुंदर रंंग झळकले

उद्या स्वतंत्र भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. भारतामध्ये यंदा 15 ऑगस्टच्या सकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा असा हा दिवस उद्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी पेक्षा कमी धामधुमीत साजरा होणार आहे. मात्र उत्साह आणि देशप्रेम हे तसच असणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त काल मुंंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बीएमसीच्या इमारतींंवर तिरंंग्याचे रंंग झळकले होते. या क्षणाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

मागील काही वर्षांपासुन, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सीएसएमटी स्थानकावर प्रोजेक्टरच्या मदतीने तिरंंग्याचे सुंंदर दृश्य झळकावले जाते. या लाईट शो ची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. अनेक जण हे दृश्य पाहण्यासाठी खास याठिकाणी भेट सुद्धा देतात. मात्र यंंदा हे दृश्य ऑनलाईन बघुनच आनंद मानावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button