breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोदी सरकारच्या कृषि विधेयकाविरोधात पंजाबात भडका, शेतकऱ्यांकडून महामार्ग ठप्प

चंदीगड – विरोधकांचा विरोध डावलत कृषि विषयक विधेयके आज राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे संसदेत मंजूर करण्यात आली आहेत. दुसरीकडे मात्र, करोनाकाळातही पंजाब – हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मात्र या विधेयकाविरुद्ध आपलं आंदोलन तीव्र केलंय. अनेक शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ‘रस्ता रोको’ आंदोलन करत महामार्ग ठप्प करून टाकलेत. शेकडोंच्या संख्येनं शेतकरी अंबालाच्या रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. ट्रॅक्टरसहीत रस्त्यावर आलेल्या या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केलीय. अनेक आंदोलनकर्त्यांनी झेंडे आणि बॅनर दाखवत सरकारच्या धोरणाचा विरोध केलाय.

पंजाबहून मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आपली वाटचाल सुरू केलीय. या शेतकऱ्यांना हरियाणातल्या अनेक संघटनांचं समर्थन आणि पाठबळ मिळालंय. त्यामुळे पोलिसांनाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबाला सीमेपासून राजधानी दिल्लीपर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

पंजाबमध्ये मोहालीजवळ जीरकपूरमध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ मोठ्या संख्येत शेतकरी एकत्र जमले. कृषि विषयक विधेयकाविरोधात चंदीगड ते दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत हे शेतकरी आहेत. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून करनाल हायवे ब्लॉक करण्यात आलाय. शेतकरी दिल्ली – अंबाला – चंदीगड महामार्ग रोखण्याच्या तयारीत आहेत.

शेतकऱ्यांचं आंदोलन पाहता अंबालामध्ये सादोपूर सीमेवर पोलीस दल तैनात करण्यात आलंय. अंबालाचे पोलिस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय किसान युनियनच्या आंदोलकांनी केलेल्या घोषणेनंतर बॅरिकेडिंग करण्यात आलीय. पोलिसांची संख्याही वाढवण्यात आलीय.

हरियाणात अंबाला रेंजचे आयजी वाय. पूरन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १६-१७ शेतकरी संघटनांनी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलंय. परंतु, कायदे – व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बिघडू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button