breaking-newsआंतरराष्टीय

मेक्सिको: वादळामुळे विमानाचा अपघात होऊन 97 जण जखमी

डुरंगो- एरोमेक्सिको कंपनीचे विमान उड्डाण घेत असताना उत्तर मेक्सिकोमध्ये गारपीट व वादळामुळे विमानाला अपघात झाला. विमानाने अचानक पेट घेतल्यामुळे ९७ जण जखमी झाले आहेत. ड्युरांगो ते मेक्सिको सिटी प्रवासादरम्यान विमानाचा अपघात झाला.

‘एम्ब्रर 190’ या विमानाला काल दुपारी ३ वाजता अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. यामध्ये 88 प्रौढ, 9 अल्पवयीन, 2 बालकांचा समावेश होता. या संदर्भात एअरलाइन्सचे डायरेक्टर जनरल अँडरस कॉन्सेसा यांनी काल पत्रकार परिषद बोलावली होती.

दरम्यान, या विमान अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button