breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे |महाईन्यूज|

सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उदभवली आहे. मुंबई पुणे एक्स्र्पेस वेवर शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 

सुट्ट्यांमुळे या मार्गावरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेने प्रवास करत असल्याच या वाहतूक कोंडीमध्ये दवडला जाणारा वेळ ध्यानात घेण्याला काही प्रवासी प्राधान्य देत आहेत. 

पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरी वाहतुकीची गती पाहता, या मार्गावरुन प्रवास करणं टाळण्याचा पर्याय तूर्तास काहींनी निवडला आहे. बुधवारी आलेली शिवजयंतीची सुट्टी, त्यानंतरचा एक गुरुवार वगळता शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तिनही दिवशी शाळा, महाविद्यालयं आणि बहुतांश कार्यालयांना रजा असल्यामुळे अनेकांनीच दैनंदिन जीवनाच्या धकाधकीपासून दूर जात छोटेखानी सहलींवर जाण्याला प्राधान्य दिलं. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button