breaking-newsमनोरंजन

मुंबईत रजनी उत्सव! ‘2.0’च्या प्रदर्शनापूर्वी ६८ फूट कटआऊट, पूजा आणि बरंच काही

सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षीत 2.0 हा चित्रपट उद्या म्हणजेच २९ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी रजनीकांत यांचे चाहते उत्सुक आहेत. अनेकांसाठी रजनीकांत यांच्या चित्रपट प्रदर्शनाचा दिवस म्हणजे सुट्टीच्या वारापेक्षा किंवा एखाद्या मोठ्या सणापेक्षा कमी नसतो. यंदाही हिच जादू कायम आहे. रजनीकांत यांचा 2.0 प्रदर्शित होणार म्हटल्यावर मुंबईतील मांटुंगा परिसरात वेगळीच तयारी सुरू आहे.

रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे माटुंग्यातील अरोरा चित्रपटगृहात दसरा-दिवाळीसारखे उत्सवी वातावरण असते. यावेळी देखील परंपरेप्रमाणे येथे जोरदार तयारी सुरू आहे. नेहमीप्रमाणे रजनीकांत यांचे ६८ फूट उंच कटआऊट इथे लावण्यात येणार आहे. यापूर्वी ‘कबाली’, ‘काला’ या चित्रपटांच्यावेळीही येथे उभारण्यात आलेल्या ६७ फूट उंच कटआऊटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. २९ तारखेला चित्रपट प्रदर्शित होत आहे म्हटल्यावर येथे पहाटे चार वाजता पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. पूजा पार पडल्यानंतर सकाळी सहा वाजता 2.0 चा पहिला शो इथे दाखवण्यात येणार आहे. अर्थात रजनीकांत यांच्या चाहत्यांची फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी तूफान गर्दी जमणार आहे हे नक्की. यापूर्वीही कबाली आणि कालाचे शो पहाटे ठेवण्यात आले होते.

‘ 2.0’ हा भारतीय सिनेसृष्टीचा अभिमान- रजनीकांत

2.0 हा बिग बजेट असलेला भारतातील पहिला आणि आशिया खंडातील दुसरा मोठा चित्रपट आहे. 2.0 हा रोबोट चित्रपटाचा सिक्वल असून एस शंकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जगभरातील १० हजारांहून अधिक स्क्रिनवर तामिळ, इंग्रजी, हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button