breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतल्या बँडस्टँड या ठिकाणी समुद्रात बुडून २९ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

मुंबईतल्या वांद्रे या उपनरात असलेल्या बँडस्टँड या भागात समुद्रात बुडून एका २९ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या तरूणाचे नाव काय तो समुद्रात कसा काय बुडाला हे समजू शकलेले नाही. मात्र २९ वर्षीय तरूणाचा बँडस्टँड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ANI

@ANI

: 29-year-old man dies after drowning in sea at Bandra Bandstand.

17 people are talking about this

बांद्रा येथील बँडस्टँडलगत असलेल्या समुद्रात याआधीही बुडून काही तरूणांचा तसेच काही जोडप्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन करणारा फलकही आहे. तरीही या ठिकाणी जाणारे लोक समुद्रात जातात. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात अशा घटना याआधीही घडल्या आहेत. आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे.

या तरूणाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मुंबईतल्या बँडस्टँड या ठिकाणी हा तरूण फिरायला आला असावा त्याचवेळी समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button