breaking-newsमुंबई

मुंबईकरांसाठी देशविदेशांतील चित्रपटांची पर्वणी

  • १४ ते २० डिसेंबर दरम्यान आशियाई चित्रपट महोत्सव; ‘वेलकम होम’ने महोत्सवाचे उद्घाटन

विविध आशयघन आशियाई चित्रपटांचा समावेश असलेला ‘आशियाई  चित्रपट महोत्सव’ १४ ते २० डिसेंबर दरम्यान माटुंग्याच्या सिटीलाईट सिनेमा येथे रंगणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर लिखित आणि दिग्दर्शित ‘वेलकम होम’ या चित्रपटाने होणार आहे. चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर राजा परांजपे यांचा ‘पुढचे पाऊ ल’ हा चित्रपट ‘सेन्टेनरी ट्रीब्यूट’ या विभागात दाखवला जाणार आहे. ‘झेर’ या तुर्की चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.

भारतीय चित्रपटांच्या विभागात १३ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यात भिमराव मुढे यांच्या ‘बाडरे’ आणि नीलेश कृष्णा यांचा ‘शिमगा’ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. महिला दिग्दर्शकांच्या विभागात ‘स्वीट रेड बीन’ हा जपानी आणि ‘मदरिंग’ या इराणी चित्रपट पाहायला मिळेल. युरोपीय विभागात चार चित्रपट आहेत. ‘स्पेक्ट्रम एशिया’ विभागात जपान, बांगलादेश, इराण, अफगाणिस्तान येथील चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

मराठी, बंगाली चित्रपट अधिक

‘वेलकम होम’, ‘पुढचे पाऊ ल’, ‘बाडरे’, ‘शिमगा’ हे मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेखर रणखांबे यांचा ‘पॅम्प्लेट’, गौतम रायकर यांचा ‘मर्मबंध’, सुमीत पाटील यांचा ‘तरंग’, स्वप्निल शेटय़े यांचा ‘प्रॉन्स’, विक्रांत बादर्खे यांचा ‘द ड्रेनेज’, अभय इनामदार यांचा ‘सुदाम टेलर’ हे मराठी लघुपट दाखवण्यात येणार आहेत. आदिनाथ कोठारे यांचा ‘परस्पेक्टिव्ह’ हिंदी भाषेतील लघुपटांमध्ये पाहता येईल. पंकज बांगडे यांचे ‘बहरूपिया’ आणि ‘द नॉट’ हे लघुपटही या यादीत आहेत. सहा चित्रपट आणि दोन लघुपट बंगाली भाषेतील आहेत. यामध्ये ‘रंगोबिरंगेर कोऱ्ही’, ‘द पेन हॉकर’, ‘अंदारकाहीनी’, ‘अब्योक्तो’, ‘द ब्लॅक होल’, ‘तीन मुहुरत’ हे चित्रपट तर ‘मिनालाप’, ‘अरोरा बोरेअलिस’ या दोन लघुपटांचा समावेश आहे.

‘वेलकम होम’ची कथा प्रत्येक महिलेला आपलीच गोष्ट वाटेल. चार भिंतींना घरपण स्त्रीमुळे येते. पण नेमके तिचे घर कोणते, हा प्रश्न तिला कायमचा पडलेला असतो. हा गुंता या चित्रपटात मांडण्यात आला आहे. संवाद आणि पटकथा सुमित्रा भावे यांनी लिहिली आहे. माझी या चित्रपटात गंभीर भूमिका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button