breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ लोकसभा मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज

  • नागरिकांना लागली निकालाची उत्सुकता
  • तब्बल 84 टेबलवरून प्रक्रिया पार पडणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. बालेवाडी येथील क्रीडासंकुल येथील स्ट्राँग रुममध्ये मतदान यंत्रे सुरक्षीत ठेवली आहेत. येत्या 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 84 टेबलांवरून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. कर्मचारी, रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी कामकाज हाताळणार आहेत.

  • मावळ लोकसभा मतदार संघाचे मतदान 29 एप्रील रोजी पार पडले. सहा विधानसभा मतदार संघातील मतदान यंत्रे (ईव्हीएम मशिन्स) बालेवाडी येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. तर, पोस्टल मतदानासाठी 8 टेबल असे एकूण 92 टेबल असणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा आहे. त्यासाठी जागेची थोडी समस्या असून ती मार्गी लागेल असे कविता द्विवेदी यांनी सांगितले. मतमोजणीच्या एका टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवक्षेक, सहाय्यक पर्यवक्षेक आणि एक शिपाई असे चार कर्मचारी एका टेबलवर असतील. ईव्हीएम मशिन ने-आण करण्यासाठी रनर, स्ट्राँग रुमसाठी, वाहतूक, खान-पान सुविधेसाठी, कोतवाल असे एकूण सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणी दिवशी कार्यरत असणार आहेत. पुरेशे कर्मचारी उपलब्ध आहेत.

मतमोजणी करणा-या कर्मचा-यांना 16 आणि 22 मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील पाच ‘व्हीव्हीपॅट’ मशिनची तपासणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस असे तीन टप्पे आहेत. तीनही ठिकाणी तपासणी केली जाते. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस ओळखपत्राची तपासणी करतात. त्यानंतर राज्य राखीव पोलिसांकडून यंत्रांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मोबाईल, इतर वस्तुंची तपासणी केली जाते. याशिवाय चारही बाजूंनी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी कक्षात कोणालाही मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button