breaking-newsक्रिडा

मानवला दोन सुवर्णपदक, भारताची एकूण आठ पदके

पोर्तुगाल – मानव ठक्करने पोर्तुगाल ज्युनियर व कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदकाची कमाई केली. असून त्याच्या दोन पदकांसह भारताच्या टेबल टेनिस संघाने जोरदार कामगिरी करत या स्पर्धेत आता पर्यंत आठ पदकांची कमाई केली. ज्यामध्ये दोन सुवर्णपदक, दोन रौप्यपदक व चार कांस्यपदकाचा समावेश आहे. मानवने सुरुवातीला मुलांच्या ज्युनियर एकेरी गटात सुवर्णपदक व नंतर मनुष शाहसोबत त्याने मुलांच्या ज्युनियर गटाच्या दुहेरीचे जेतेपद मिळवले.

मुलांच्या ज्युनियर व दुहेरी गटात भारतीय खेळाडू एकमेकांविरुद्ध होते. मानवने एकेरीच्या उपांत्यफेरीत व अंतिम सामन्यात चांगलाच घाम गाळला. उपांत्यफेरीत स्नेहीत सौरवाजुलाने मानवला तगडे आव्हान दिले पण, नंतर 3-4 अशा फरकाने त्याला पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम सामन्यात देखील याच फरकाने जीत चंद्राविरुद्ध मानवने विजय नोंदवला. उपांत्यफेरीत मानवने 11-8. 6-11, 11-7, 11-5, 7-11, 6-11, 11-4 असा विजय मिळवला तर, अंतिम सामन्यात त्याने 11-5, 7-11, 10-12, 11-8, 9-11, 11-4, 11-9 अशा विजयाची नोंद केली.

त्यापुर्वी मानवने राऊंड ऑफ 32 मध्ये चीनच्या मेंगयांग झिओंगविरुद्ध 4-0 असा विजय मिळवत चांगली सुरुवात केली.त्यांने उपांत्यपुर्व व उपांत्यफेरीत अनुक्रमे इटलीच्या जॉन ओयबोडे (4-1) व पोर्तुगालच्या गोन्सालो गोम्स (4-0) यांना नमविले. जीत व स्नेहीत याने मानवला ज्युनियर दुहेरीच्या लढतीत चांगले आव्हान दिले. पण, मानवने मनुषसह 3-2 (11-7, 11-6, 13-15, 7-11, 11-6) असा विजय नोंदवला. जीतने दोन अंतिम सामन्यात रौप्यपदकाची कमाई केली व त्यामधील दुसरे पदक त्याने स्नेहीतसोबत मिळवले.

भारताचे मुलींच्या ज्युनियर एकेरी गटातील आव्हान उपांत्यफेरीतच संपुष्टात आले. सेलेना सेल्वाकुमार व स्वस्तिका घोष यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. सेलेना व स्वस्तिका यांना अनुक्रमे पोर्तुगालच्या यांगझी लिऊ व चीनच्या झिआओस क्‍युनकडून 0-4 अशा समांतर फरकाने पराभूत व्हावे लागले. सेलेनाला 8-11, 16-18, 8-11, 3-11 असे तर, स्वस्तिकाला 13-11, 11-3, 11-6, 12-10 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

मुलींच्या ज्युनियर दुहेरी गटात सेलेनाने कांस्यपदक मिळवले. फ्रांसच्या मारी चॅपेटसोबत खेळताना उपांत्यफेरीत स्पेनच्या राकेल मार्टिन्स व सेलिआ सिल्वा जोडीकडून 0-3 असे पराभूत व्हावे लागले. भारतीय जोडी अनुषा कुटुंबले/मनुश्री पाटील आणि स्वस्तिका घोष/ प्राप्ती सेन यांना अनुक्रमे उपांत्यपुर्व व उप-उपांत्यपुर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button