breaking-newsपिंपरी / चिंचवड

माजी आमदार लांडेच्या घरी जय मल्हार फेम ‘देवदत्त नागें’नी घेतले गणरायाचे दर्शन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मराठी मालिका ‘जय मल्हार’ फेम अभिनेते देवदत्त नागे यांनी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. देवदत्त नागे यांनी श्रींची आरती देखील केली.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक विक्रांत लांडे, तसेच कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. विलास लांडे यांच्या घरी दरवर्षी परंपरेनुसार बाप्पाचे आगमन होते. श्रींची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली जाते. लांडे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर हजेरी लावतात. आज अभिनेते देवदत्त नागे यांनी लांडे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button