breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महूदमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी कल्पनाराजे भोसलेची सीईआेकडे तक्रार

सोलापूर – साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी सांगोला तालुक्यातील महूद येथील छत्रपती भोसले घराण्याच्या जागेवर चाललेले पाच मजली अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी  शुक्रवारी दुपारी येथील झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे केली आहे. 

राजमाता कल्पनाराजे भोसले या शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला झेडपीमध्ये आल्या. त्यांनी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन तक्रारी अर्ज दिला. सांगोला तालुक्यातील महूद बु. येथे मालमत्ता क्र. ७२६/१ ही भोसले घराण्याची आहे. या जागेवर उत्तम मारुती खांडेकर (रा. नवी लोटेवाडी, ता. सांगोला) यांनी सिटी सर्व्हे क्र. १३०/२ अन्वये रेखांकन मंजूर करून घेऊन पाच मजली बांधकाम सुरू केले आहे. या मिळकतीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या बांधकामाचे रेखांकन रद्द करावे व जागेवर सुरू असलेले बांधकाम तातडीने पाडून टाकावे, असे नमूद केले आहे. 

या जागेवर मंजूर केलेल्या रेखांकनास हरकत घेतली होती. तरीही मंजूर रेखांकन आराखड्याविरुद्ध अनधिकृत बांधकाम नियमांची पायमल्ली करून करण्यात आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने पाडून टाकण्यात यावे, अशी मागणी राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केली आहे. खांडेकर यांच्या तीन पिढ्यांनी भोसले यांच्या जागेवर रहिवास केला आहे, पण आता कोणतीही परवानगी न घेता त्यांनी जागेवर बांधकाम केले आहे. याबाबत राजमाता भोसले यांचे कर्मचारी विचारणा करण्यास गेल्यावर खांडेकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविला आहे. लोक खाल्ल्या मिठाला जागत नाहीत. त्यामुळे कायदेशीर मार्गाने जागेबाबत तक्रार करीत असल्याचे राजमाता कल्पनाराजे यांनी म्हटले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button