breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनासाठी भाविकांसाठी ड्रेस कोड…

वाराणसीमधील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. विशेषतः ज्यांना गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी ड्रेस कोड पाळणे बंधनकारक असणार आहे.

मंदिरातील गाभाऱ्यात ज्यांना ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घ्यायचे आहे. अशा पुरुषांनी धोतर आणि कुर्ता घालणे बंधनकारक असणार आहे तर, महिलांनी साडी घालणे बंधनकारक असणार आहे… ज्या भाविकांनी हे कपडे घातले आहेत. त्यांनाच गाभाऱ्यात जाऊन ज्योतिर्लिंगाला स्पर्श करता येईल. जे भाविक पँट, जीन्स, शर्ट आणि टी शर्ट घालून येतील त्यांना मंदिरात लांबूनच दर्शन घ्यावे लागेल. काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि धर्मार्थ कार्य मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी सर्व उपस्थितांकडून त्यांच्या सूचना आणि सल्ले मागितले. जास्तीत जास्त भाविकांना ज्योतिर्लिंगाचे स्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी काय करता येईल, यासाठीही सूचना मागविण्यात आल्या.मंदिरात पूजा करणाऱ्या गुरुजींसाठीही ड्रेसकोड असावा, अशीही सूचना परिषदेतील सदस्यांनी यावेळी केली. त्यामुळे आता या नविन नियमाचे भाविक कितपत स्वागत करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button