breaking-newsराष्ट्रिय

महिला कैद्यावर रुग्णालयात सामूहिक बलात्कार

बिहारमधील सीतामढी तुरुंगातील महिला कैद्यावर मुझफ्फरपूर येथील श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला कैद्याला ११ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सीतामढी येथील कारागृहातील महिला कैद्यावर मुझफ्फरपूरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. ११ नोव्हेंबरला तिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. १४ नोव्हेंबर रोजी महिलेवर रुग्णालयातील स्वच्छतागृहात दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. छोटेलाल कुमार आणि शैलेश कुमार या दोघांनी बलात्कार केल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.

ANI

@ANI

Bihar: A prisoner of Sitamarhi jail was allegedly raped by two persons on the night of November 14 in the washroom at Sri Krishna Medical College and Hospital (SKMCH) in Muzaffarpur, where she was taken for treatment on November 11. Case registered, investigation underway

२७ लोक याविषयी बोलत आहेत

उपचारानंतर कारागृहात परतल्यावर पीडितेने कारागृह अधीक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अहियापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button