breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीव्यापार

महिंद्राने लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त ‘बोलेरो’; किंमत फक्त…

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हिंदुस्थानात लोकप्रिय असलेली ‘बोलेरो’ (Mahindra Bolero B2) एसयूव्हीचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट लॉन्च केला आहे. कंपनीने अधिकृतपणे नवीन बोलेरोच्या फीचर्सची घोषणा केलेली नाही. मात्र अशी अपेक्षा केली जात आहे की, यात एअरबॅग, पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशन, एबीएस, पार्किंग सेन्सर्स यासारखे मूलभूत फीचर्स दिले जाऊ शकतात.

BS6 Mahindra Bolero टॉप व्हेरिएंट्सबद्दल बोलायचे झाले तर यात स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स, ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टमसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, म्युझिक सिस्टम, पॉवर विंडोज, सेन्ट्रल लॉकिंग आणि रीअर वॉश सारखे फीचर्स देण्यात आले आहे. नवीन बोलेरोमध्ये बीएस 6-कंपिलियंट, एमएचडब्ल्यूके 75, 1.5-लीटर, डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 76hp पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.बोलेरोच्या या व्हेरिएंटची किंमत 7.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button