breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या पावणे तीन हजार कर्मचा-यांना मिळणार लाभ ; आयुक्तांची अर्जित रजेचे रोखीकरण करण्यास मान्यता

महापालिकेतील कर्मचा-यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील 2005 नंतर रुजू झालेल्या सुमारे दोन हजार 700 कर्मचा-यांना परिभाषित अंशदान निवृ्त्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यातील सेवानिवृत्त, राजीनामा व मयत झालेल्यांचे खाती जमा असलेल्या अर्जित रजेचे रोखीकरण केले जात नव्हते. त्यातील कित्येक कर्मचारी मयत झाले आहेत. त्या कर्मचा-यांच्या वारसांना अर्जिंत रजेचे रोखीकरणाचा आर्थिक फायदा मिळणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दि.०१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करणेत आलेली आहे.  सदर योजनेतील कर्मचारी सेवानिवृत्त/राजीनामा/मयत झालेस त्यांचे खाती जमा असलेल्या अर्जित रजेचे रोखीकरण केले जात नव्हते. दरम्यानच्या काळात महापालिकेतील अंदाज ६० ते ६५ कर्मचारी मयत झाले आहेत. या कर्मचा-यांच्या वारसांना अर्जित रजेचे रोखीकरणाचा आर्थिक फायदा मिळत नव्हता.

सदर प्रकरणी महापालिकेतील अविनाश ढमाले व इतर कर्मचा-यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजी निवेदन देऊन वेळोवेळी केलेल्या पाठपुरावा केला. तसेच महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते यांनी केलेल्या सहकार्यामुळे तब्बल 13 वर्षानंतर लेखा विभागाकडून सादर प्रस्तावास आयुक्तांनी मान्यता देवून अर्जित रजेचे रोखीकरण करणेस मान्यता दिलेली आहे.

तसेच महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील ज्या अधिकारी/कर्मचा-यांची अर्जित रजा रोखीकरणाची प्रकरणे प्रलंबित आहेत. ती प्रकरणे तातडीने निकाली काढणेबाबत कळविले आहे. सदरचा लाभ महापालिकेतील सेवानिवृत्त/राजीनामा/मयत झालेल्या ६० ते ६५ कर्मचा-यांच्या वारसांना व सध्या कार्यरत असलेल्या २७०० कर्मचा-यांना सेवानिवृत्तीवेळी होणार आहे. तसेच तरी मयत कर्मचा-यांच्या वारसांना आवाहन करणेत येते की त्यांनी याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button