breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेची अनधिकृत पत्राशेड, टप-यावर कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने नवी-जूनी सांगवी, चिंचवड, निगडी परिसरातील अनधिकृत पत्राशेडसह टप-यांवर धडक कारवाई करण्यात आली.

‘ह’ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रा अंतर्गत नवी सांगवी, जुनी सांगवी परिसरात अनधिकृत बांधकामे झाली होती. या बांधकामांवर अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये एकूण 1584.00 क्षेत्रफळ स्केवअर फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये उपरोक्त प्रमाणे सहा अनधिकृत पत्राशेड निष्किसित करण्यात आले. ही कारवाई सहशहर अभियंता यांचे अधिपत्याखाली महापालिकेचे संबंधीत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  एक उपअभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, आठ बीट निरीक्षक तसेच अतिक्रमण विभागाचे  दहा मनपा पोलिस, एक जेसीबी, एक गॅस कटर, तीन डम्पंरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

‘ब’ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रा अंतर्गत चापेकर चौक ते मोरया गोसावी मंदिर गांधी पेठ, वाल्हेकरवाडी रोड ते चिंतामणी चौक येथील विनापरवाना अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईमध्ये 13 हातगाड्या, एक लोखंडी टेबल, एक लोखंडी रॅक, दोन लोखंडी बोर्ड, सात प्लास्टिक ट्रे इत्याही साहित्य  जप्त करण्यात आले. तसेच ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रा अंतर्गत निगडी प्राधिकरण येथे टिळक चौक ते भेळ चौक येथील विनापरवाना अतिक्रमण काढण्यात आले.  या कारवाईमध्ये एक स्टील टपरी, लोखंडी पान कांऊटर, दोन लोखंडी टपरी, चार हातगाड्या, 12 प्लास्टिक स्टूल, एक स्टील टाकी, 25 प्लेट, एक गॅस शेगडी, एक मोठी छत्री, एक सॉस कॅन, एक लोखंडी कडई, दोन लोखंडी झारे, 25 प्लास्टिक इत्यादी साहित्य जप्त करण्यात  आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button