breaking-newsमुंबई

मरीन ड्राईव्हवर भीषण कार अपघात, उद्योगपतीच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मित्रांसोबत कारने भटकंती करणं तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मरीन ड्राईव्हवर भागात उभ्या असेलल्या बसवर भरधाव कार धडकून झालेल्या भीषण अपघातात एका बड्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू झाला.

कारचालक तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल (मंगळवार 12 मे) संध्याकाळी कार चौपाटीकडे जात असताना मरीन ड्राईव्ह उड्डाणपुलापासून सुमारे 100 मीटर अंतरावर हा अपघात झाला. कारमध्ये तिघे जण असल्याची माहिती आहे. तिसरा मित्र वेदांत पाटोदियासुद्धा जखमी आहे

अपघातात मृत्युमुखी पडलेला 18 वर्षीय आर्यमान नागपाल हा नेपियन्सी रोड भागातील रहिवासी होता, तर कार चालवणारा त्याचा 19 वर्षीय मित्र शौर्यसिंग जैन हा कफ परेडला राहतो. त्याला हरकिशन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कार शौर्यसिंग जैनच्या मामाची होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button