breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

मराठा क्रांती मोर्चा करणार राजकीय पक्षांच्या कार्यालयावर ‘आक्रोष आंदोलन’

पुणे/ पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (दि. 27 सप्टेंबर) रोजी हे सकाळी दहा वाजता पुण्यातील नेहरूनगर स्टेडियम येथून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी दिली.

हे आंदोलन नेहरूनगर स्टेडियम येथून थेट टिळक रस्ता, हिराबाग येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर काढला जाणार आहे. तेथून डेक्कन बस स्टॉपच्या मागील शिवसेना पक्ष कार्यालय, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेन गेटसमोरील भाजपच्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यानंतर दुपारी बारावाजता कॉंग्रेसच्या कार्यालयावर हा मोर्चा आक्रोष करणार आहे.

सर्वांनी कोविड 19 आणि पोलीस प्रशासनाचे नियम पालन करून आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. सर्वांनी सकाळी दहा वाजता पुण्यातील नेहरूनगर स्टेडियम याठिकाणी हजर रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button