breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक, एअर अॅम्ब्युलन्समधून गोव्याकडे पाठवले

नवी दिल्ली – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती तीव्र चिंताजनक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मागील शुक्रवारपासून पर्रिकर हे दिल्लीच्या AIMS रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. गेले काही महिने ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. पर्रिकर यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पर्रिकर यांना एअर अॅम्ब्युलन्समधून गोव्यासाठी रवाना करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी काळजी घेण्यासाठी AIMS च्या डॉक्टरांचं पथक पर्रिकरांसोबत गोव्याला रवाना करण्यात आलं आहे.

दरम्यान, मार्च महिन्यातही 62 वर्षांच्या मनोहर पर्रिकरांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले. त्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते आणि पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेला जावं लागलं होतं. या  वाढत्या आजारपणामुळे मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा पर्रिकरांनी व्यक्त केली.

काही काळासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा पर्रिकरांनी व्यक्त केली होती. पर्रिकरांना पुन्हा अमेरिकेला जावं लागणार होतं, ही त्यांची तिसरी खेप होती, आणि त्यामुळे परत येईपर्यंत मुख्यमंत्रिपदाची सूत्र दुसऱ्याच्या हाती सोपवण्याची इच्छा त्यांनी अमित शहांकडे व्यक्त व्यक्त केली होती. पण मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री कायम राहतील असा निर्णय अमित शहा यांनी जाहीर केला. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं एम्सच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button