breaking-newsराष्ट्रिय

मनोज वाजपेयी, थिमक्का यांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान

लोकगीत गायिका तीजनबाई, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे अध्यक्ष अनिलकुमार नाईक, वैज्ञानिक ए. नम्बी नारायणन, अभिनेते मनोज वाजपेयी, ज्येष्ठ पर्यावरणवादी एस. थिम्मक्का यांच्यासह विविध क्षेत्रांतील ५४ मान्यवरांना शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. तीजनबाई आणि नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रा. स्व. संघाचे नेते दर्शनलाल जैन, एमडीएच संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी महाशय धरमपाल गुलाटी, वैद्यकीय व्यावसायिक अशोक लक्ष्मणराव कुकडे, नम्बी नारायण, बचेंद्री पाल आणि माजी महालेखापाल व्ही. के. शुंगलू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, हर्षवर्धन, राज्यवर्धनसिंह राठोड, विजय गोयल, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि ज्येष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासह वकील एच. एस. फूलका, शास्त्रज्ञ सुदाम लक्ष्मण काटे, अणुभौतिकी शास्त्रज्ञ रोहिणी मधुसूदन गोडबोले, क्रिकेटपटू गौतम गंभीर, तबलावादक स्वपन चौधरी, पांचजन्यचे माजी संपादक देवेंद्र स्वरूप (मरणोत्तर), जवळपास ६५ वर्षे हजारो वृक्ष लावणाऱ्या आणि त्यांची मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या वृक्षमाता एस. थिक्कम्मा आदींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button