breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय ! 

                     
स्विकृत सदस्य पदे डावलली ; कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे तक्रार 
                                                                                                
पिंपरी –  भोसरी विधानसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्विकृत सदस्य पदावर जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याना डावलण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्त पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात भोसरी विधानसभा मतदारसंघातील जून्या निष्ठावंत कार्यकर्यांनी आमरण उपोषण केले. त्या विषयाची गंभीर दखल भाजपचे पिंपरी चिंचवड प्रभारी रवी अनासपुरे यांनी भेट घेवून कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी बाळासाहेब मोळक, अजय पाताडे, शेखर लांडगे, संतोष तापकीर, पोपट हजारे दत्ता (तात्या) तापकीर, दिलीप गोसावी, राजेंद्र वायसे, संजय बडे या कार्यकर्त्यानी भोसरी विधानसभा मतदारसंघातील तक्रारी करून आमच्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली. तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठही प्रभाग समितीवर प्रत्येक तीन याप्रमाणे 24 जागेवर स्विकृत सदस्य निवडण्यात येणार आले. या 24 जागेसाठी 121 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महापालिकेवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व राहिल्याने प्रभागातील 24 जागेवर सदस्यांना संधी देण्यात आली.
दरम्यान, पिंपरी चिंचवड प्रभारी रवी अनासपुरे यांची भेट घेतली असता निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांची शहराध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, उलट शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेच्या जुन्या तीन निष्ठावंतांना  स्विकृत सदस्य पदावर संधी देवून सन्मानच केला आहे. आमची शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबाबत कोणतीही तक्रार नव्हती, आमचा प्रश्न केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातील स्विकृत सदस्य पदाबाबत आम्ही आमरण उपोषण केले होते. त्या उपोषणाबाबत आज आमच्यावर अन्याय झाला म्हणून प्रदेश कार्यकारणीने हा विषय समजावून घ्यावा व आमच्यावर झालेल्या अन्यायाची वाचा फोडावी या करिता आम्ही आमरण उपोषण केले होते. याबाबत दखल घेवून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button