breaking-newsराष्ट्रिय

भावंडांवर फेकलं उकळतं तेल, समोस्याचा १ रुपया कमी दिल्याची शिक्षा

समोसा विकत घेताना एक रुपया कमी देण्यावरुन झालेल्या वादावादीतून दुकान मालकाने कडईतून उकळते तेल भावंडांच्या अंगावर फेकले. उत्तर प्रदेशात मथुरा येथे मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. पीडित व्यक्तीच्या भावाने सहा रुपयाचा समोसा विकत घेतला. पण सुट्टे पैसे नसल्यामुळे त्याने पाचच रुपये दिले. अवघा एक रुपया कमी देण्यावरुन झालेल्या वादातून आरोपी सुरेश कुमार आणि त्याच्या मुलांनी दोन्ही भावांना मारहाण केली.

हेमराज आणि त्याचा भाऊ विष्णू (२२) रीताया बाजारातील मिठाईच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांनी ६ रुपयाचा एक समोसा विकत घेतला. पण त्याने पाचच रुपये दिले म्हणून सुरेश कुमार आणि त्याच्या मुलांनी विष्णूला मारहाण सुरु केली. विष्णूने मला फोन करुन सर्व घडला प्रकार सांगितला.

मी तिथे पोहोचलो त्यावेळी आरोपींनी कडईतून उकळते तेल आमच्या दोघांच्या अंगावर फेकले असे हेमराज म्हणाला.  भावाला वाचवताना हेमराज मोठया प्रमाणात भाजला आहे. दुकान मालकाने उकळते तेल जाणीवपूर्वक फेकले कि, अपघाताने त्याचा आम्ही तपास करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button