breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप पक्षनेत्यांचा आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ – संदीप काटे

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपाचा पलटवार
  • पक्षनेत्यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही !

पिंपरी / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत करण्याऐवजी भाजपच्या नगरसेवकांनी 1 कोटी 27 लाखांचा निधी केंद्राच्या पंतप्रधान सहायता निधीला दिला. याची खंत न बाळगता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी राज्य सरकारचा स्वतंत्र निधी वापरून शहरात 816 बेडच्या ‘जम्बो कोविड सेंटर’ची उभारणी केली. त्यासाठी स्थानिक भाजप पदाधिका-यांनी एक छदाम देखील दिला नाही. असे असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके हे कोणत्या नैतिक अधिकाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करतात ?, असा सवाल राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नागरिकांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत. यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचा फंड उपलब्ध करून नेहरूनगर येथे 616 अद्यावत ऑक्सिजन बेड आणि 200 आयसीयू बेडचे ‘जम्बो कोविड सेंटर’ अल्पावधीत उभे केले. रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्यामुळे आज शहरात कोरोनाबाधितांचा उच्चांकी आकडा झपाट्याने कमी होताना दिसत आहे. अजित पवार यांच्यामुळेच शहर कोरोनामुत्त होत आहे. तरी, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. ‘जम्बो कोविड सेंटर’ची यंत्रणा कशी कार्यरत आहे, याची पाहणी करण्याचा सोपस्कार देखील ढाके यांनी कधी केला नाही. ‘जम्बो कोविड सेंटर’ उभारण्यात भाजपचे काहीही योगदान नाही. असे असताना आपण कोणत्या अधिकाराने पालकमंत्री अजितदादांवर आरोप करतो, याचे ढाके यांनी आत्मपरिक्षण करावे, असा टोमणाही काटे यांनी लगावला आहे.

संपूर्ण शहर कोरोना विषाणुच्या यातना भोगत असताना यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ची गरज होती. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांचे एक महिन्याच्या वेतनाचे 1 कोटी 27 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याऐवजी पंतप्रधान सहायता निधीसाठी पाठविण्यात आले. भाजपच्या नेत्यांनी सुध्दा ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत केली नाही. यावरून भाजपच्या कारभा-यांना शहरातील नागरिकांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते. राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडमध्ये उभारलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’वर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, भाजपच्या एकाही पदाधिका-याने या जम्बो रुग्णालयाकडे कधी डुंकूनही पाहिले नाही. ठेकेदारांची बाजू घेऊन अजितदादांवर आरोप करणा-या भाजप पक्षनेत्यांनी स्वतःच्या नैतिक जबाबदारीचे भान ठेवावे, असा सल्लाही काटे यांनी दिला आहे.

भाजप पक्षनेत्यांची बाष्कळ बडबड

राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी वायसीएम आणि औंध जिल्हा रुग्णालयात ‘पीपीई’ किट खरेदीसाठी 50 लाखांचा निधी दिला. राष्ट्रवादीच्या 37 नगरसेवकांनी एक महिन्याच्या वेतनाचे 5 लाख 70 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम उपलब्ध करून दिली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करून त्यावर राजकीय पोळी भाजू पाहणा-या भाजप पदाधिका-यांनी स्वतः काय करत आहोत, याचे भान ठेवावे. दादांच्या कामाची पध्दत बघायची असेल तर एखाद्या अधिका-याला विचारा म्हणजे समजेल, असे सूचक इशारा करत पक्षनेत्यांची बाष्कळ बडबड म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याचा आरोपही काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button