breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या प्रयत्नांमुळेच निगडीपर्यंत मेट्रो विस्तारिकरणाला मंजुरी

  • क्रिडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांची माहिती
  • दोन्ही आमदारांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान 

पिंपरी / महाईन्यूज

निगडीपर्यंत मेट्रो विस्तारित करण्याची नागरिकांची मागणी विचारात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी त्याचा डीपीआर बनविण्याचे काम केले. भाजप पदाधिका-यांच्या पाठपुराव्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचे सर्वस्वी श्रेय हे पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांचे आहे. त्यामुळे विरोधकांचा श्रेयवादासाठी निव्वळ अटापीटा सुरू असल्याची टिका क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी अशा दोन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड मार्गिकेचा विस्तार निगडीपर्यंत करण्याची मागणी चिंचवड, यमुनानगर आकुर्डी व निगडी भागातील रहिवाशांकडून केली जात होती. यापूर्वी या विस्ताराला मान्यता देण्यात आली होती. परंतु, कोव्हिड-१९ नंतरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्राने मेट्रो प्रकल्पातील हिस्सा कमी केल्याने अतिरिक्त खर्चासाठी पुन्हा राज्य सरकारच्या मान्यतेची गरज होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता या प्रकल्पामध्ये राज्य सरकारचा हिस्सा १७० कोटी रुपयांचा असेल, तर उर्वरित निधी कर्ज आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती केंदळे यांनी दिली.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते निगडी दरम्यानच्या ४.४१ किमी लांबीच्या विस्ताराला बुधवारी (दि. 17) राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी ९४६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा २० टक्क्यांवरून १० टक्के केला गेला आहे. त्यामुळे 90 टक्के खर्चाचा अतिरिक्त भार राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला उचलावा लागणार आहे, अशीही माहिती सभापती केंदळे यांनी दिली आहे.

————

निगडीपर्यंत मेट्रो विस्ताराचा डीपीआर भाजपने तयार केला

स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मंजूर झाल्यानंतर त्याचा लाभ निम्या शहरालाही होणार नव्हता. हे भाजपचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या लक्षात आले. त्यांच्या सूचनेनंतर स्थायी समितीने मेट्रो विस्ताराचा म्हणजे ती निगडीपर्यंत नेण्याचा डीपीआर तयार करण्यासाठी लागणा-या खर्चाला २० डिसेंबर २०१८ ला मंजूरी दिली. सर्वसाधारण सभेनेही त्याला मान्यता देत हा ठराव राज्य सरकारकडे पाठवला. तसेच, मेट्रो विस्तार कामाचा पूर्ण खर्च करण्याची तयारी पालिकेने दाखवल्याने मेट्रोचा निगडीपर्यंतचा मार्ग सुकर झाला. मेट्रो विस्ताराची केवळ मागणीच केली नाही, तर त्यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा देखील केला आहे. भविष्यात मेट्रो चाकणपर्यंत नेण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याच्याही विस्तारिकरणाला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी मिळेल, अशी आपेक्षा सभापती केंदळे यांनी व्यक्त केली आहे.

————

भाजपने सादर केलेल्या प्रस्तावामुळे निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला मंजुरी मिळाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी आता अनेकजण पुढे येतील. मागणी किंवा आंदोलन करणे हे केवळ नावाला असते. प्रत्यक्षात लागणारी प्रशासकीय प्रक्रिया, डीपीआरचा खर्च, पाठपुरावा भाजपने केलेला आहे. त्यामुळे मेट्रो विस्ताराला राज्य मंत्रीमंडळाने दिलेल्या मंजुरीचे यश हे भाजपचेच आहे, हे न समजण्याइतपत जनता दुधखुळी नाही.

सभापती प्रा. उत्तम केंदळे, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button